Ad will apear here
Next
अजरामर गीत रामायण
भारतीयांच्या मनात रामायणाबद्दल नितांत श्रद्धा आहे. श्रीराम चरित्राने समाजजीवनावर अनेक संस्कार घडविले आहेत. हा संपूर्ण रामकथा गीतांमधून साकार करण्याची कल्पना आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे तत्कालीन सहनिर्देशक सीताकांत लाड यांना सुचली. ज्येष्ठ कवी ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांच्यावर गीते लिहिण्याची व सुधीर फडके (बाबूजी) यांच्यावर संगीत देण्याची जबाबदारी आली. या जोडगोळीने गीत रामायणाचे पहिले गीत १९५५च्या रामनवमीला आकाशवाणीवरून सादर केले. गीत रामायणाचे शेवटचे गीत १९५६च्या रामनवमीला सादर झाले.

आकाशवाणीवरून प्रसारित झालेली ५६ गीते, त्याच्या सादरीकरणाची पद्धत, त्या काळात घडलेल्या घटना, ‘गदिमा’, ‘बाबूजी’ यांच्याबद्दल आठवणी अरुण गोडबोले यांनी ‘अजरामर गीत रामायण’मधून सांगितल्या आहेत. शब्द आणि स्वर यांचा अद्वितीय संगम, सुरेल वाद्यमेळ यातून रामायणासारखी अजरामर कलाकृती निर्माण झाली. आज ६० वर्षांनंतरही याची मोहिनी रसिकांवर का आहे, हे या पुस्तकातील अक्षरधनातून मिळते.

पुस्तक : अजरामर गीत रामायण
लेखक : अरुण गोडबोले
प्रकाशक : कौशिक प्रकाशन
पाने : २५६
किंमत : १०८ रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZPRBZ
Similar Posts
अजरामर ‘गीत रामायण’ ‘मोडू नका वचनास-गाथा मोडू नका वचनास, भरतालागी द्या सिंहासन, रामासी वनवास’ या गदिमांच्या लेखणीतून उतरलेले हे शब्द गायिका कुमुदिनी पेडणेकर यांनी गायिले आहे. ग. दि. माडगूळकर यांचे शब्द, सुधीर फडक्यांची संगीतरचना आणि सीताकांत लाड यांचे संयोजन यातून साकारलेल्या गीत रामायणाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले
रत्नागिरीत १९ एप्रिलला रंगणार ‘गीतरामायण’ रत्नागिरी : सुधीर फडके (बाबूजी) आणि ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांच्या जन्मशताब्दीनिमित्त इंद्रधनुष्य यांच्या वतीने गीतरामायणाचा कार्यक्रम १९ एप्रिल २०१९ रोजी येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
‘बाबूजींना भारतरत्न मिळावा’ नाशिक : ‘सुधीर फडकेंचा (बाबूजी) शास्त्रीय गायनाचा पाया भक्कम होता. कोणत्याही रागातील गाणे ते भाव ओळखून गात. त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, ही मागणी रसिकांनी करायला हवी. मीदेखील केंद्र सरकारला विनंती केली आहे,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध संगीतकार, गायक श्रीधर फडके यांनी केले.
‘गदिमा...बाबूजी अन् बेरजेचे राजकारण’ पुणे : ‘गीतरामायण कार्यक्रमाच्या रॉयल्टीवरून सुधीर फडके (बाबूजी) आणि ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांच्यामध्ये दुरावा वाढला. त्यांचा संवाद बंद झाला. महाराष्ट्राचे खूप नुकसान होईल, असे प्रत्येकजण म्हणू लागला. दरम्यान, सैनिकांच्या कल्याण निधीसाठी पुण्यात एका कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language